निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
“उद्घाटन सोहळ्याने रंगणार निपाणीतील क्रिकेटचा थरार; ‘कै. डी. व्ही. पाटील स्मृती चषक’ स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भव्य निमंत्रित फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार”
हिंदवी स्पोर्ट्स क्लब, निपाणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कै. डी. व्ही. पाटील स्मृती चषक’ निमंत्रित फुल पिच क्रिकेट स्पर्धेला रविवार दि. 24 मे 2026 पासून उत्साहात प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 24 मे ते 28 मे 2026 या कालावधीत पार पडणार असून निपाणीतील क्रिकेटप्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री मा. श्री. वीरकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष, विद्यमान व माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पर्धेचे आयोजन हिंदवी स्पोर्ट्स क्लब व निकू पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच क्रीडाभावना वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
उद्घाटन समारंभ रविवार दि. 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता एम. डी. विद्यालय, अर्जुननगर, निपाणी येथे संपन्न होणार आहे. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.