निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील ,अग्रेसर ,आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध ,श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या अकोळ रोड निपाणी शाखेचा 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, संस्थेचे सहकाररत्न, संस्थापक चेअरमन आणि विद्यमान व्हॉइस चेअरमन, डॉक्टर सी बी. कुरबेट्टी व संस्थेचे चेअरमन किशोर बाली (सीए) आणि शाखेचे एमडी प्रताप पटनशेट्टी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवर व शाखा चेअरमन अर्चना बुर्जी व व्हाईस चेअरमन राजश्री पाटील व महिला संचालिका यांच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप प्रजनन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रधान कार्यालयाचे चेअरमन किशोर बाली (सीए) हे होते.
कार्यक्रमांमध्ये बोलताना शाखेचे एमडी प्रताप पट्टणशेट्टी,म्हणाले की आज या शाखेत 8 कोटी ठेवी असून, कर्ज वितरण 3 कोटी 50 लाख केले असून, वार्षिक उलाढाल 25 कोटी झाली असून, शाखेस 31 /03/2026 अखेर 8 लाख 4 हजार रुपये नफा झाल्याचे सांगितले. महिला संचालकांनी अगदी उत्तम प्रकारे शाखा चालवल्यामुळे. आज शाखेचे नाव प्रगतीपथावर आहे. शाखेच्या यशामध्ये महिला भगिनींचा मोठा सिंहाचा वाटा आहे. याचे सर्व श्रेय या शाखेच्या महिला संचालक मंडळाला जाते.
कार्यक्रमास मुख्य कार्यालयाचे संचालक डॉक्टर एस आर पाटील. श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे ,दिनेश पाटील, राजेश पाटील ,महिला संचालिका ,पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस के आदन्नावर शाखा संचालिका सुनिता डेक्कनवर ,साधना चौगुले ,गीता कदम, दीपा कंकणवाडी ,ज्योती सांगावकर ,सुप्रिया जाधव, स्मृती परमणे., प्रतिभा कुलकर्णी, हेड ऑफिस चे असिस्टंट सीईओ सुरज घोडके, व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा मॅनेजर विठ्ठल कोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शाखा चेअरमन अर्चना बुर्जी मानले.