निपाणी नगरी वृत्तसेवा (30) अर्जुननगर
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणाऱ्या कर्मचारी एस आर भोपळे-प्रभावळे यांचा सेवनिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ पार पडला. यावेळी मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन भोपळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांनी मनोगतातून सत्कार मूर्तींच्या सेवा कालावधीतील विविध आठवणी सांगितल्या तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सन्मान पत्राचे वाचन यु एम सातपुते यांनी केले तरडी बी बेनाडे ,व्ही के चव्हाण यांच्यासह कु सानवी फल्ले, संस्कृती सोकांडे यांनी आपल्या मनोगतातुन भोपळे यांच्या आठवणी सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर डी पाटील, आर एस भोसले,कर्मचारी प्रतिनिधी ए व्ही तेली व भोपळे परिवारातील सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही आर पाटील यांनी केले तर आभार एस बी यादव यांनी मानले. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह,यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.