निपाणी नगरी वृत्तसेवा (3)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळा व गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये कर्नाटकातील पारंपारिक बेंदूर सण उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रवीणा शाह संचालक श्रीमान प्रसन्न दोशी डॉ.सौ. एस जे पाटील श्री आर पी बामणे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले सौ ए आर पाटील यांनी बेंदूर सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले
यावेळी शाळेत श्री विशाल नाईक नाईक मळा लखनापूर यांच्या बैलजोडीची शाळेच्या आवारात मिरवणूक काढण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले तसेच त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व विद्यार्थिनींना समजावे व त्यांच्या मनामध्ये भारतीय संस्कृती, आपले सण व ग्रामीण परंपरेबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी यु बी नागावे ,एम एम चिकोडे , एस आर ईराज ,पी आर पाटील ए डी पाटील ओ एम कुलकर्णी व्ही ए निगवे एस एस घाटगे आर व्ही मधाळे आर आर सुतार के आर चोपडे पी एम कवाळे ए आर आवळेकर ,चव्हाण,इंदलकर ,केरीमनी , एस आर हवालदार तसेच सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.