निपाणी नगरी वृत्तसेवा (15)
निपाणी मराठा मंडळ संचलित, बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, आय.टी.आय कॉलेज व मराठा मंडळ सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी मराठा मंडळ निपाणीचे अध्यक्ष रवींद्र रघुनाथराव कदम, मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम, निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, सचिन कदम, विश्वास पाटील, बबन अण्णा चौगुले, किरण पाटोळे, संदीप चावरेकर, वचन सुतार यांच्यासह मराठा मंडळाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास निपाणी टाऊन पोलीस स्टेशनचे पी.एस.आय शिवानंद महालिंगप्पा कारजोळ तसेच महिला पी.एस.आय नर्सपणावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथींनी देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक युवकाने जबाबदार नागरिक म्हणून देशसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मन लावून भरपूर अभ्यास करावा, व्यसनांपासून दूर राहावे तसेच आपल्या कर्तृत्वातून कुटुंबाचे, गावाचे, शाळेचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
त्यानंतर प्रमुख अतिथी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासो बी आर मोहिते व आयटीआयचे प्राचार्य एस आर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर, शारीरिक शिक्षक जे. आर. खपले व एस. एस. पाटील तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख एस. डी. साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम. यादव यांनी केले. यावेळी हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही.व्ही पत्की, के एल कांबळे, के एस देसाई, अर्चना पाटील , पूजा पाटील , प्रियांका पाटील, धनश्री पाटील, एस बी. चौगुले, लेखनिक मुकुंद कोरे. प्राथमिक विभागाचे अमोल पाटील, जी एस पाटील, पी एस घाटगे, एस बी कांबळे, व्ही एस बुरुड, जे पी ढंगे, एस एस मोरे, एम ए चव्हाण, अश्लेषा केसरकर, विद्यार्थी शिक्षक शिक्षण इतर , कर्मचारी उपस्थित होते.