निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ.भागीरथीबाई शाह कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत उज्वल यश संपादन केले .क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय, निपाणी यांच्यावतीने नुकत्याच बेडकिहाळ याठिकाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या . व्हॉलीबॉल (Volleyball) खेळात शाळेच्या 14 वर्षांखालील (Under-14) आणि 17 वर्षांखालील (Under-17) अशा दोन्ही वयोगटातील विद्यार्थिनींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत *प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दोन्ही संघाना मिळालेल्या या घवघवीत यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी दिमाखात निवड झाली आहे
दोन्ही संघाना मिळालेला हा विजय अत्यंत प्रेरणादायी असून, खेळाडूंच्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे. सर्व विद्यार्थ्यिनींना संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शहा व सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे. पाटील व क्रीडा शिक्षिका ए. डी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.