निपाणी नगरी वृत्तसेवा (4)
जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने वारणानगर येथे नुकत्याच झालेल्या शासकीय विभागस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू *कु. धनश्री अमोल पाटील* हिने कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना ५२ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले. तिची निवड शासकीय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे. विजयी खेळाडूचे महाविद्यालयातील सर्व घटकामार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन.
विजयी खेळाडूला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री. सुबोधभाई शाह, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. रमेश साळुंखे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक डोनर, पर्यवेक्षक प्रा. बी.बी. वसावे तसेच जिमखानाप्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक प्रा.निरंजन जाधव, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार, श्री. अनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.