निपाणी नगरी वृत्तसेवा..(6)
संतानी आपणा सर्वांना जो भक्तीमार्ग दाखविला तो चांगला समाज घडविण्यासाठीच श्री प्राणलिंग महास्वामीजी यांनी निपाणी येथील श्री गजानन महाराज मंदिरासाठी श्री बसवेश्वर पोलिस स्टेशनच्या बाजूस जागा मंजूर झाली आहे. याठिकाणी मंडळाचा अधिकृत फलक लावण्यात आला. याप्रसंगी श्री प्राणालींग स्वामीजी यांचे हस्ते श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे व फलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले मंदिरे ही फक्त पूजापाठ करण्यासाठी नसतात तेथून देशभक्त व आदर्श नागरिक घडविण्याचे कार्यही झाले पाहीजे. भक्तीमार्ग चांगली पिढी तयार करण्याचा मार्ग दाखवतो.
निपाणी येथील ‘श्रीसंत गजानन महाराज शेगांव सेवा संस्था , निपाणी, ही रजिस्टर संस्था असून या संख्येचे कार्य रावण गल्ली येथे श्री उतळेकर यांचा घरी चालत असते. यामध्ये प्रति गुरुवारी सायंकाळी महाराजांची आरती, गजानन महाराज प्रकट दिन व पुण्यतिथी कार्यक्रम हे उत्सव साजरे केले जातात. वर्षातून 2 वेळा महाप्रसादाचे ही आयोजन केले जाते. सुमारे 1000 से 1500 भक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात.
लवकरच मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्यास सुरूवात होणार असून मंदिराच्या बांधकामासाठी भक्तानी सढळ हस्ते हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रविण उतळेकर, महेश दिवाण, विलास नारे, उदय शिंदे, किरण पाटोळे, नंदिनी पोटजाळे, महादेव गवळी, डॉ. सविता रामनकट्टी, सुंदर जाधव, आशाराणी कुलकर्णी, लता उतळेकर, सुयोग उतळेकर, श्री बसव गोपाळ आश्रम शाळेचे विद्यार्थी व बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.