निपाणी नगरी वृत्तसेवा..(6)
येथील लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बक्षीस वितरण आणि वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले.
स्कूलचे चेअरमन प्रसन्नकुमार गुजर स्कूलचे व्हाईस चेअरमन सचिन खोत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रत्नपारखी ए एच मोतीवाला , पराग शेवंतीलाल गुजर , यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच एम ए नाईक , रोहित भाई कर्णावत , प्रकाश कदम , प्रथमेश कुंभार ,अनुराधा गुजर ,सीमा गुजर स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे यांचे फुल देऊन स्वागत केले
त्यादरम्यान रत्नपारखी मोतीवाला तसेच पराग गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा टिपूगडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला
प्रसन्नकुमार गुजर म्हणाले मुलांनी कशाप्रकारे सराव केला व विविध ठिकाणी विविध कलांचे सादरीकरण केले हे त्यांनी जवळून बघितले आहे मुलांनी अखंड प्रयत्न करून पुष्कळ ठिकाणी यशाचे शिखर गाठले आहे
त्याचप्रमाणे डान्स कोरिओग्राफर ज्योती प्रशांत चिकोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व त्याचे फळ त्यांना मिळाले
मराठी हिंदी इंग्लिश साउथ इंडियन देशभक्तीपर गीत एक्सप्रेशन लेस डान्स पारंपारिक डान्स भाऊक होणारे नाटके रॅम वॉक अशाप्रकारे विविध कला मुलानी रंगमंचावर सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले.
शाळेचे चेअरमन व्हाईस चेअरमन प्रमुख पाहुणे शिक्षक शिक्षिकेतर विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात पार पडला.