निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे दिनांक 4 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान होत असलेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी देवचंद महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू कु. श्रद्धा संजय पाटील हीची महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या सराव शिबिरातून तिची निवड महाराष्ट्र राज्य संघात झालेली आहे. सध्या ती वाराणसी येथे महाराष्ट्र संघातून सहभाग घेत आहे.
विजयी खेळाडूला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी .डी.इंगळे , IQAC प्रमुख डॉ. पी.डी. शिरगावे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक श्री. निरंजन जाधव, महाराष्ट्र हॉलीबॉल असो.चे उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. भालचंद्र आजरेकर, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार व श्री. शिवदास चव्हाण श्री.अनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.