निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथी बाई शाह कन्याशाळा व गर्ल्स मराठी कॉन्हेंट स्कूल शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य विज्ञान रंगोली, हस्तकला प्रदर्शन उत्साहात संपन्ना झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ दत्ता पाटील, संस्थेचे खजिनदार श्रीमान अनिलकुमार मेहता, संचालिका सौ प्रविणाभाभी शाह, संचालक श्रीमान प्रसन्ना दोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. एस. जे. पाटील, आए. पी. बामने आदी उपस्थित होते.
विद्यार्थीनी यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, सोलार ट्रॅकर, वॉटर क्लिनिंग मशीन, रेन वॉटर डिटेक्टर, AI बेस्ड ॲग्रीकल्चर टेरेस गार्डन, प्लास्टीक रिसायकल, चांद्रयान, सॉईल मोच्शर सेन्सर, यासह जवळजवळ 50 उपकरणे मांडली होती. हस्तकलेत विणकाम, शिवणकाम, भरतकाम या प्रकारातील तयार केलेल्या वस्तू मांडल्या होत्या. निसर्ग चित्राच्या सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या.
तसेच विद्यार्थीनीच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. रामायण, लोकनृत्य, लावणी, देशभक्ती गीतनृत्य, तांडव नृत्य राजस्थानी नृत्य, गुजराती नृत्य, लाठीकाठी प्रबोधनात्मक नाटक आदी बहारदार कार्यक्रम विद्यार्थीनींनी सादर केले. या कार्यक्रमातील अनेक नृत्य प्रकाराला बाहेरील सांस्कृतिक संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कार्यक्रमातील नृत्याला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला पालक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम काय असतो येतो कसा सादर करायचा असतो याची झलक मिळाली.
कार्यक्रमास यू.बी नागावे एम एम चिकोडे, एस आर इराज, व्ही. ए.निगवे, एस.एस. घाटगे, ए. आर. पाटील, आर व्ही मधाळे, आर आर सुतार, के एन. मंगसुळी, जे.एम. शिंत्रे ,जे.सी चंद्रकुडे के. एस भादुले, पी.एम.कवाळे, जयश्री कुरबेट्टी, सी एम.बाडकर पी. आर. पाटील, ओ.एम. कुलकर्णी आर. ए कांबळे यांच्यासह विद्यार्थीनी पालक मोठ्या उपस्थित होते.