निपाणी नगरी वृत्तसेवा..(10)
ट्रॅक अकॅडमीच्या स्कॉलरशिप परीक्षेला निपाणी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
इ. १० वीच्या शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग; गुणवत्तेला चालना देणाऱ्या ट्रॅक अकॅडमीच्या सकारात्मक वाटचालीचा प्रत्यय
निपाणी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात विश्वासार्ह नाव असलेल्या ट्रॅक अकॅडमी तर्फे इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित विषयांची स्कॉलरशिप (टॅलेंट) परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली. या परीक्षेला तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकते सोबतच गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा संत बाबा महाराज कॉलेज, निपाणी येथे आयोजित करण्यात आली होती. एकूण १०० गुणांची बहुपर्यायी (MCQ) स्वरूपातील परीक्षा इंग्रजी, कन्नड व मराठी या तीन माध्यमांत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या वेळी संस्थेचे संचालक सचिन पाटील, व्यवस्थापक रमेश राबते, शिक्षकवर्ग, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ट्रॅक अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले.
ट्रॅक अकॅडमीने अल्पावधीतच निपाणी तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध मार्गदर्शन आणि निकालाभिमुख तयारी यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सातत्य व योग्य दिशा निर्माण करण्यावर अकॅडमीचा भर आहे. याच सकारात्मक वाटचालीचा परिणाम म्हणून आज ट्रॅक अकॅडमी विद्यार्थ्यांसह पालकांचाही विश्वास संपादन करत पुढे जात आहे.
शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या आणि ग्रामीण-शहरी विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणाऱ्या ट्रॅक अकॅडमीच्या या उपक्रमामुळे भविष्यातील गुणवंत विद्यार्थी घडण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.