निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
शिवाजी विद्यापीठ मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देवचंद महाविद्यालयातील कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागातील विद्यार्थिनी कु. नामिरा देसाई हिने गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच कु. स्वप्नाली खवरे हिने चौथा क्रमांक पटकाविला आहे.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. आशिषभाई शाह व उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्ती भाभी शाह, देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. पी. डी. शिरगावे व डॉ.प्रा. किरण आबिटकर प्रा. अमृता गोंधळी प्रा. सोनाली कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षकेतर कर्मचारी रणजीत कोळी यांचे सहकार्य लाभले. देवचंद कॉलेजच्या सर्व घटका मार्फत यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे.