निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (20)
देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील इंग्रजी विभागामार्फत आयोजित देवचंद इंग्रजी टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्या प्रा. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक प्रा. डॉ. ए. एस. डोनार, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. एम. एस. काळे आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांस जलार्पण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्या प्रा. एस. पी. जाधव यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी सीमा भागातील तब्बल 23 माध्यमिक विद्यालयांमधून ही परीक्षा घेण्यात आल्याचे सांगितले. या परीक्षेसाठी एकूण 1250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून गुणवत्ते नुसार प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इंग्रजी विषया बाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती या परीक्षेमुळे दूर होत असून स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी व वेळ व्यवस्थापन याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सराव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एस.एस.एल.सी. इंग्रजी विषयासाठी पूरक ठरणारा हा पेपर अभ्यासपूर्वक सोडवल्या मुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक व इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक शिक्षक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार सुबोधभाई शाह यांच्या प्रेरणेतून ही परीक्षा घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
शाळानिहाय गुणानुक्रमे निकाल पुढीलप्रमाणे :
1. सरकारी मराठी हायस्कूल, शिप्पूर – सिद्धी खामकर, मैथिली पाटील, सुरेखा कांबळे
2. श्री. आपणगौडा पाटील हायस्कूल, कणगला – नंदिती अंकले, प्रदीप सूर्यवंशी, अंजना मिळके
3. सोलापूर हायस्कूल, सोलापूर – पृथ्वीराज शेंडे, रविराज शिंदे, आर्यन कोरवी
4. माध्यमिक हायस्कूल, मतिवडे – शुभांगी घोटणे, आर्या चौगुले, तनवी घोटणे, सायली थोरबोले
5. पंचक्रोशी विद्यालय, नागनूर – वैष्णवी पावले, वैष्णवी किरण पाटील, वैष्णवी सुनील पाटील
6. सरकारी मराठा हायस्कूल, यमगर्णी – ऐश्वर्या थरकर, प्रणय कुंभार, महेक बुद्धिहाळे
7. न्यू इंग्लिश स्कूल, सौंदलगा – चैत्राली साळुंखे, सृष्टी माळी, मानसी कुंभार
8. अक्कोळ हायस्कूल, अक्कोळ – अथर्व इंगळे, आशिष कांबळे, वैष्णवी देसाई, अमानत बाणदार
9. श्रीमती पार्श्वमती हायस्कूल, अक्कोळ – रिया कानडे, ऋणाली भिवसे, अनुष्का कानडे
10. मराठा मंडळ गर्ल्स हायस्कूल, अक्कोळ – श्रावणी भारमल, नंदिनी जाधव, श्रावणी सदावर्ते
11. सिद्धेश्वर विद्यालय, कुर्ली – आरती डोंगरे, वेदिका पाटील, संचिता पाटील
12. सरकारी मराठी हायस्कूल, अप्पाचीवाडी – प्रणव पाटील, मयुरी हेरवाडे, स्नेहल पाटील
13. सरकारी मराठी हायस्कूल, कुन्नूर – केतन कोळी, गणेश पाटील, आसमा मुल्ला
14. एम. एन. डी. हायस्कूल, खडकलाट – गायत्री व्हंटमुरे, तनिष्का चव्हाण, हर्षदा बदके
15. निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी – श्रावणी जाधव, प्रगती सोलंकुरे, श्रावणी खडके
16. म्युनिसिपल हायस्कूल, निपाणी – ओंकार जाधव, तेजस कांबळे, स्वराज पुजारी
17. श्रीमती भगीरथीबाई शाह कन्या शाळा, निपाणी – संस्कृती संकपाळ, जानवी घोडके, उर्मिला माने
18. विद्या मंदिर, निपाणी – पृथ्वीराज साठे, श्रेया कांबळे, प्रीती वाळके
19. पी. आर. सी. हायस्कूल, गळतगा – विद्या तिकुटे, शिवानी घोटणे, यशोदा मोरे
20. श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल, श्रीपेवादी – माधव व्हरांबळे, श्रेयश मगदूम, साईराज पोवार
21. श्री. ए. एस. पी. हायस्कूल, स्तवननिधी – रोहन निकम, अंकिता घाटगे, सुयश गवंडी
22. विद्यासागर हायस्कूल, शेंडूर – दिशा कांबळे, आदिती पाटील, प्रज्ञा धोंडफोडे
23. संमती विद्या मंदिर, सिदनाळ – प्रदीप मधाळे, सुरक्षा जाधव, नितीन विभुते. याप्रसंगी अनिल यादव, राजेंद्र शेंडगे व मुख्याध्यापक श्री. के. ए. थरकर यांनी मनोगतातून या परीक्षेच्या आयोजनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कुंभार यांनी केले तर आभार प्रा. सदानंद झळके यांनी मानले. ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी इंग्रजी विभागातील प्रा. विकास माने व प्रा. कल्पना पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, मार्गदर्शक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.