निपाणी नगरी वृत्तसेवा..(26)
निपाणी मराठा मंडळच्या वतीने बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, आय.टी.आय कॉलेज तसेच मराठा मंडळ सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन मराठा मंडळ मैदानावर अत्यंत उत्साहात व राष्ट्रभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनुप प्रकाश चौगुले व माधुरी अनुप चौगुले (कोल्हापूरचे प्रसिद्ध सुवर्णकार) या दाम्पत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांचे मनोगत सादर करण्यात आले.
कार्यक्रमास निपाणी मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश रघुनाथराव कदम, संचालक सचिन कदम, चंद्रकांत जासूद, विश्वास मारुती पाटील, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य एस. आर. कुलकर्णी, माध्यमिकचे मुख्याध्यापक डी डी हळवणकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. मोहिते, प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील,
हायस्कूल विभागातील ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, तसेच अर्चना पाटील, अयोध्या मोरबाळे, प्रियांका पाटील आणि लेखनिक मुकुंद कोरे उपस्थित होते.
प्राथमिक विभागातील एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सुवर्णकार अनुप चौगुले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मराठा मंडळचे अनेक माजी विद्यार्थी आज सैन्यदलात देशसेवा करत आहेत, तर अनेकांनी डॉक्टर, इंजिनिअर, तंत्रज्ञ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही विद्यार्थी परदेशातही विविध क्षेत्रांत कार्यरत असून, हे मराठा मंडळच्या शैक्षणिक परंपरेचे यशस्वी फळ आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षणा सोबतच प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी दडलेली कला, कौशल्य व छंद ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या कलेचा सातत्याने विकास केला, मेहनत व शिस्त जपली तर तीच कला भविष्यात तुमची ओळख ठरते. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांवर नव्हे, तर कौशल्यांवर यश अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी कला, तंत्रज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करावे व देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे प्रेरणादायी विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा खराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभा घाटगे यांनी केले.