निपाणी नगरी वृत्तसेवा..(26)
येथील लिटल एंजल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन प्रथमेश कुंभार तर ध्वजारोहण रोहित भाई कर्नावट यांनी केले.
शाळेतील लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या देशाचा अभिमान बाळगत पारंपारिक वेशभूषा केली होती व आपल्या बोबड्या बोलांनी आपण कोण आहे हे सांगितले त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने भाषण स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
मुलांनी हिंदी इंग्लिश कन्नड या तिन्ही भाषेचा वापर करत आपल्या भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे सांगितले भारतीय संविधान कोणी लिहिले हे स्पष्ट केले तसेच 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु 26 जानेवारी 1950 ला भारताचे संविधान लागू होऊन देश खऱ्या अर्थाने लोकशाही बनला. आपल्या तिरंग्याचे उद्देश काय आहेत हे सांगतच हा दिवस देशाची एकता अखंडता आणि लोकशाही मूल्ये आठवण्याचा आणि साजरा करण्याचा दिवस आहे हे सुद्धा सांगितले गेले.
मुलांनी उत्कृष्टरित्या आपल्या भाषणात मुद्दे आजमावले होते. अशाप्रकारे भाषणाची सांगता करताच बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे रोहित भाई कर्नावट आणि शाळेचे संस्थापक प्रसन्नकुमार गुजर यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आली.
तसेच शाळेच्या संस्थापिका सीमा गुजर यांनी काही अभ्यासू व कष्टाळू मुलांना आपल्या वतीने बक्षीसे दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांसह शाळेचे चेअरमन संस्थापिका सीमा गुजर शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन आनंदात पार पडला.