निपाणी नगरी वृत्तसेवा..(8)
आज रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी निपाणी मराठा मंडळ संचलित सांस्कृतीक भवन, निपाणी येथे श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन अतिशय मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मराठा मंडळ सांस्कृतिक भवन परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली.
या पावन प्रसंगी आयोजित करण्यात आलेली महाआरती श्री. राजेश रघुनाथराव कदम (मालक) यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. महाआरती नंतर उपस्थित सर्व भाविकांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या वाटपाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या महाप्रसाद प्रसंगी श्री.रोहन साळवे (मालक), काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगरसेवक श्री. संदीप चावरेकर, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये आय.टी.आय मराठा मंडळ निपाणीचे प्राचार्य श्री. एस. आर. कुलकर्णी, निपाणी मराठा मंडळाचे व्यवस्थापक श्री. अशोक संकाजे, निपाणी मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. मोहिते, तसेच प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल पाटील यांचा समावेश होता.
हायस्कूल विभागातून ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, तसेच लेखनिक श्री. मुकुंद कोरे उपस्थित होते.
प्राथमिक विभागातून एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर आदी शिक्षकवृंदाची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रकट दिन अतिशय मोठ्या उत्साहाने, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. निपाणी मराठा मंडळाच्या वतीने या पवित्र कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षक वृंदाचे, कर्मचारी वर्गाचे व भाविकांचे संयोजक कमिटी कडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.