निपाणी नगरी वृत्तसेवा (22)
मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व ध्यान करून झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा आर. घाटगे यांनी योग हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शारीरिक लवचिकता, स्नायूंची ताकद आणि फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत होते. मनाचे संतुलन राखणे, नैराश्य व थकवा दूर करण्यासाठी योगा आणि ध्यान अत्यंत फायदेशीर ठरतात.
यावेळी शारीरिक शिक्षण शिक्षक सुधाकर पवार यांनी विविध योग प्रकाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्यासोबत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी उत्साहाने विविध योग प्रकार केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.