निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
११० केव्ही समाधीमठ उपकेंद्रातील (Station) आवश्यक देखभाल व दुरुस्तीच्या तातडीच्या कामामुळे उद्या, २५ जून २०२६ रोजी शहरातील आणि परिसरातील वीज पुरवठा सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत असा एकूण ४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वादळ-वारा आणि पावसामुळे वीज यंत्रणेत संभाव्य बिघाड किंवा तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी ही पूर्वतयारी व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित राहून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याच उद्देशाने ही तातडीची देखभाल केली जात आहे. या कामामुळे उद्या दुपारी २ वाजेपर्यंत वीज नसल्याने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी आपली पाण्याची तसेच इतर महत्त्वाची घरगुती व व्यावसायिक कामे सकाळी १० पूर्वीच पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.