निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर(22)
योग प्रशिक्षक अनिल श्रीखंडे यांनी योगासन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे प्रत्येकाने नियमितपणे योग केल्यास आरोग्यमय दीर्घआयु मिळवू शकतो असे मत व्यक्त केले व विविध योगासनांचे फायदे व वैज्ञानिक महत्त्व सांगून प्रात्यक्षिके करून घेतली. मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले यावेळी श्रीमती गोडबोले यांनी सर्वांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सुरवातीस क्रीडाशिक्षिका श्रीमती व्ही व्ही पाटील यांनी प्रस्तlविकातून योगाचे महत्त्व सांगितले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर डी पाटील, आर एस भोसले,एन सी सी प्रमुख एस एम चौगुले, एअर विंग प्रमुख एस एस मगदूम ,क्रीडा शिक्षक ए एच आळवे शिक्षक प्रतिनिधी एस बी यादव ,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला एनसीसी ,एअर विंग, एन एस एस सह सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन निरंजन जाधव यांनी केले.
कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह, उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभाभाभी शाह, व डॉ.सौ तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.