निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्री निकेतन कन्नड आणि मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी शाळेत शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले श्री निकेतन शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी शाळेचे सेक्रेटरी श्री प्रदीप पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अलका भोसले सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या उपस्थित नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर करून उत्साहात जागतिक विज्ञान दिन साजरा झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत गाऊन तर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री रामचंद्र येवते व सौ स्नेहल पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील सहशिक्षिका सौ अर्चना कुंभार मुख्याध्यापिका भोसले, श्री अरुण शिंदे, श्री जितेंद्र कांबळे, श्री कृष्णा ढाले यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर सी व्ही रामण यांनी शोध लावलेल्या रामन इफेक्ट बद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीचा विद्यार्थी कु राजवीर मोरे याने केले तर आभार प्रदर्शन इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. मधुर चव्हाण याने केले.