निपाणी नगरी वृत्तसेवा..(12)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत जिल्हा कायदा समिती, पोलीस खाते व क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय, निपाणी व कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पोक्सो कायदा, बालविवाह, बालकामगार निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड .रूपाली सदलगे तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे. पाटील, आर पी बामणे आदी उपस्थित होते.
इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सौ एस जे पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले यावेळी बोलताना एडवोकेट सदलगे म्हणाल्या,अलीकडे लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत .18 वर्षाखालील मुला मुलींचे लैंगिक अत्याचार, शोषण रोखण्यासाठी भारत सरकारने हा पोक्सो कायदा कायदा तयार केला आहे. यामध्ये आरोपी व्यक्तीस कडक शिक्षा व दंड होऊ शकतो. आपल्या माहितीत अशा घटना घडल्यास निर्भयपणे त्यांची माहिती देणे गरजेचे आहे .तसेच बालकामगार व बालविवाह या समस्या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. विवाहासाठी मुला मुलींच्या वयाची अट तसेच यासंदर्भात कायद्यातील तरतुदी व शिक्षणाचे महत्त्व या संदर्भात सविस्तर माहिती दिली .
श्री पी आर पाटील यांनीही बालकामगार व बालविवाह याविषयी माहिती सांगितली यावेळी यु बी नागावे, एस आर ईराज, एम एम चिकोडे, ए डी पाटील आर व्ही मधाळे आदी शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या .श्री सी एम बाडकर यांनी आभार मानले.