निपाणी नगरी वृत्तसेवा..(8)
देवचंद महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. क्रीडा महोत्सवाची सुरुवात वैयक्तिक क्रीडा प्रकारातील बुद्धिबळ,कॅरम सिंगल,डबल, बॅडमिंटन,टेबल टेनिस व वेटलिफ्टिंग या स्पर्धांनी झाली.
यानंतर सांघिक क्रीडा प्रकारातील क्रिकेट, कबड्डी व व्हॉलीबॉल या स्पर्धा संपन्न झाल्या. शेवट मैदानी क्रीडा प्रकारातील धावणे, उडी मारणे व फेकीच्या बाबी या स्पर्धेने झाला. स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रो.जी. डी. इंगळे यांच्या शुभहस्ते झाले. मैदानी क्रीडा प्रकारात सर्वाधिक गुण मिळवून श्री. आदर्श पाटील व कु.श्रद्धा पाटील यांनी अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या गटातील वैयक्तिक चॅम्पियनशिप जिंकली.
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा मा.डॉ.सौ.तृप्तीभाभी शाह, खजिनदार मा.श्री.सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रो.जी.डी. इंगळे, IQACचे प्रमुख डॉ.पी.डी.शिरगावे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी जिमखाना विभागाचे कर्मचारी यांचे बहुमूल्य योगदान लाभले.