निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
आपल्या महाविद्यालयाची उदयोन्मुख राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू कु. मारिया संदेश सुतार हिची वाराणसी येथे होणाऱ्या युथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे. वर्धा येथे झालेल्या युथ राज्यस्तरीय स्पर्धेतील उपविजयी संघात तिने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर तिची वरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मारिया चे महाविद्यालयाच्या सर्व घटकांकडून कौतुक होत आहे.
विजयी खेळाडूला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी .डी.इंगळे , IQAC प्रमुख डॉ. पी.डी. शिरगावे, भारतीय व्हॉलीबॉल फेडरेशनचे सहसचिव प्रा. बाळासो सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. भालचंद्र आजरेकर, क्रीडा शिक्षक श्री. निरंजन जाधव, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार व श्री. शिवदास चव्हाण श्री. अनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.