निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
नेहमीच अपघात प्रवण क्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी गावाजवळ अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ साताप्पा चौगुले (वय २५ रा. म्हाकवे ता. कागल) असे मृताचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सौरभ चौगुले हा दुचाकीवरून येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यावर आयोजित कृषी मेळावा पाहण्यासाठी गेला होता. तेथून तो दुचाकीवरून आपल्या मूळगावी रात्री साडेअकरा वाजता म्हाकवे येथे जात होता. त्यावेळी यमगर्णी जवळ त्याच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले असताना उपचारादरम्यान त्याच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यासह इतर ठिकाणी दुखापत झाली. अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे दाखल केले होते. पण, उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार व सहकाऱ्यांनी भेट दिली.
बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. चौगुले कुटुंबामध्ये सौरभ हा एकुलता होता. तो सौंदलगा आणि कुर्ली फाट्यावर एका कापड दुकानात काम करत होता. त्याच्या मृत्यूमुळे म्हाकवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, आजी असा परिवार आहे.