निपाणी नगरी वृत्तसेवा.(17)
छ. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नूतन मराठी विद्यालय निपाणी येथे सातवी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री विक्रमादित्य धुमाळ, मुख्याध्यापक एस एस पचंडी एम डी खोत उपस्थित होते अध्यक्ष स्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री व्हि. एम.बाचणे होते. कार्यकमाची सुरुवात सरस्वती फोटोपूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी धनश्री घोडके, समर्थ घोडके, तनया गोडसे हरिओम लोहार प्रतीक्षा चौगुले असद नदाफ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सातवीचे वर्ग शिक्षक एस. पी. जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिले. प्रमुख पाहुणे विक्रमादित्य धुमाळ यांनी स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकर केला पाहिजे असे सांगितले. एस एस पचंडी यांनी आपल्या जीवनामध्ये गुरूंना खूप महत्त्व आहे या बद्दल मार्गदर्शन केले एम डी खोत यांनी विद्यार्थांना अभ्यासाबद्दल चे महत्व पटवून दिले. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही एम बाचणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर संस्कार ही खूप महत्वाचे आहेत हे सांगितले. या कार्यक्रमासाठी एस. एस. कुलकर्णी यू. वाय. आवटे एस. आर. संकपाळ एस. के जोशी ए. एम. कुंभार यू. एम पाटील सह विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. जगदाळे यांनी केले तर आभार एस. के. जोशी यांनी मानले.