“अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश आणि हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत संपादन केलेले उज्ज्वल यश हे त्यांच्या बुद्धिमत्तेचा, चिकाटीचा आणि गुणवत्तेचा ठसा उमटवणारे आहे. ऑलिम्पियाड परीक्षा या केवळ शैक्षणिक चाचण्या नसून विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि सर्जनशील विचारांची खरी कसोटी असतात. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना संकल्पनांवर आधारित शिक्षणाची सवय लागते आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची मानसिकता विकसित होते. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, जिज्ञासा वाढते आणि ज्ञानाच्या नव्या क्षितिजांचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते. भविष्यातील स्पर्धा परीक्षा, करिअर आणि संशोधन क्षेत्रासाठीही हा भक्कम पाया ठरतो. या यशामागे शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन हा कणा असतो. शिक्षक केवळ अध्यापन करत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतेला दिशा देत त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देतात. कठीण विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगत, सातत्यपूर्ण सराव आणि प्रेरणेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण करतात. त्यांच्या अथक परिश्रम, प्रोत्साहन आणि मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले असून, हे यश संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानास्पद ठरले आहे.”
निपाणी नगरी वृत्तसेवा..(1)
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश ,हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. त्यामध्ये गणित विषयात इयत्ता सातवीतील यश राजाराम सावंत तर इयत्ता दहावी रोशनी मोहन बोंगार्डे, श्रावणी गिरीश पोकले, श्रावणी संदीप पोतदार यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले. इंग्लिश विषयातून इयत्ता सातवीतील दूर्वा अनिल वडे, गायत्री अरुण पाटील, गायत्री सागर चौगुले तसेच आठवीच्या नम्रता गंगाधर मगदूम यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले. हिंदी विषयातून इयत्ता सहावीतील रीदम रमेश कंग्राळकर, समर्थ सतिश पाटील, सुयोग विलास पावले तर इयत्ता सातवीतून कौस्तुभ शीतल गंथडे, श्रुतिका उत्तम सुतार ,स्नेहल सचिन मिसाळ, स्वरांजली संदीप पेडणेकर तसेच इयत्ता नववीतुन अन्वेषा हरीशकुमार पाटील, मयुरा अरविंद साळुखे, शर्वरी अभिजीत पाटील, प्रज्ञा दादासाहेब कांबळे, प्रतिक्षा युवराज तोडकर यांनी बाजी मारली त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस. एम. गोडबोले यांच्यासह एस बी यादव,एन एन गुरव, एस एम मगदूम,एस.एम. जाधव, एस. जी. खोत, यु एम सातपुते, आर आर कपले, एस. के. बुच्चे यांचे मार्गदर्शन लाभले.