निपाणी नगरी वृत्तसेवा..(3)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने, इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेत उज्वल यश संपादन केले,
त्यामध्ये आठवीतील ज्ञानेश्वरी पवार, श्रावणी यादव, प्रतीक कदम, शिवकुमार झळके, तर *पाचवीतील* जान्हवी वडगुले,अर्णव राठोड, आरोही शिंदे या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली, त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
सदर यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्यासह एस एच श्रीखंडे, एस बी यादव, पी एस सावळवाडे,यु एम सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.