निपाणी नगरी वृत्तसेवा.(14)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,दिन दलितांचे प्रेरणास्थान ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त देवचंद महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले . महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . आपल्या मनोगतात म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेबांनी संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी आपले आयुष्य वेचले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले व बुद्धिमत्ता आणि चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर उच्च शिक्षण ही संपादन केले. स्वातंत्र्य समता बंधुता तीन मूल्यांचा स्वीकार करून देशाची राजघटना लिहिली. त्यांच्या या महान कार्यामुळेच सर्वांना समानतेचा अधिकार मिळालेला आहे. त्यांचे कार्य आजही तुम्हा आम्हाला प्रेरणादायी आहे. कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ.एस.पी. जाधव यांनी सर्वच क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. देशाची राजघटना लिहून त्यांनी सर्वांना समानतेचा अधिकार बहाल केला. स्त्रियांचे साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.पर्यवेक्षक डॉ. मेजर अशोक डोनर म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला संघर्षातून यश मिळण्याची प्रेरणा देते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रभाकर पोळ यांनी केले. तन्वी पारटे ,सानिका पटेकरी यांनी आपली मनोगत व्यक्त केली .जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह उपाध्यक्षा डॉ .सौ .तृप्ती भाभी शाह, संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रा. नानासाहेब जामदार, विष्णू पाटील ,शिवाजी कुंभार,अमोल नारे,आशा साळुंखे, राणी सोकासने, वनिता कांबळे, दीपक पाटील, भालचंद्र आजरेकर, संजय पाटील, दयानंद अनुसे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्रीरंग जबडे यांनी मानले.