निपाणी नगरी प्रतिनिधी (18)
“निपाणीत “हॉटेल मोरे”चा भव्य शुभारंभ; चविष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५:२५ वाजता उद्घाटन; मिसळ, वडासांबार, चपाती-भाजीसह खास पदार्थांची रेलचेल”
निपाणी शहरातील खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून “हॉटेल मोरे” या नव्या हॉटेलचा भव्य शुभारंभ रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता होणार आहे. कुरबेट्टी खाऊ कट्टा, बेळगाव नाका (निपाणी) येथे सुरू होणारे हे हॉटेल चविष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी खास ओळख निर्माण करणार आहे.
या हॉटेलमध्ये ‘मोरे स्पेशल मिसळ’, ‘स्पेशल वडासांबार’, ‘वडा चटणी’ तसेच ‘चपाती-भाजी’ यांसारख्या पदार्थांची चव चाखण्याची संधी निपाणीकरांना मिळणार आहे. दर्जेदार साहित्य, स्वच्छता आणि घरगुती चवीचा संगम साधत ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प हॉटेल मोरेतर्फे करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजक श्री. पांडु मोरे (मामा) व शुभम मोरे यांनी केले आहे.
निपाणी शहरात वाढत्या खाद्यसंस्कृतीत “हॉटेल मोरे” हे आणखी एक आकर्षण ठरणार असून, चटकदार आणि परवडणाऱ्या दरात स्वादिष्ट खाद्यपदार्थ देण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
📍 ठिकाण : कुरबेट्टी खाऊ कट्टा, बेळगाव नाका, निपाणी
📞 संपर्क : ९७४०४०९७२४