निपाणी नगरी वृत्तसेवा..(18)
“चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या निपाणी सुवर्णदालनाचा शानदार शुभारंभ संपन्न. निपाणीकरांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद”
दागिन्यांच्या क्षेत्रात दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा जपणार्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या २० व्या निपाणी शाखेचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री. संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स, येरुडकर पेट्रोल पंप समोर, हनुमान मंदिर शेजारी, निपाणी येथे संपन्न झाला. शुभारंभा पासूनच निपाणीकरांनी दागिने खरेदीसाठी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.
या सुवर्णदालनाचा शुभारंभ के.एल.ई. शिक्षण संस्थेचे संचालक श्री. अमर बागेवाडी, आय.एम. ए. निपाणीचे अध्यक्ष डॉ. कौस्तुभ खांडके, बसवेश्वर क्रेडीट सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ सी. बी. कुरबेट्टी, युवा उद्योजक व अरिहंत बँकेचे अध्यक्ष सहकाररत्न श्री उत्तम पाटील, उद्योजक श्री. चंद्रकांत कोठिवाले, उद्योजक श्री. इरफान महात, अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष श्री. अभिनंदन पाटील, चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक श्री. अतुल शहा, सौ. संगिता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ शहा, श्री. आदित्य शहा, सौ. दामिनी शहा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
परंपरा, विश्वास आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा अनोखा संगम असलेले चंदुकाका सराफ ज्वेल्स हे नाव पिढ्यानपिढ्या ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक राहिले आहे. आता निपाणीकरांसाठी सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या आकर्षक, पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइन्सचा विशेष सुवर्णसंग्रह एकाच छताखाली उपलब्ध झाला आहे.
या शुभारंभा निमित्त निपाणीकरांसाठी खास आकर्षक ऑफर्स चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी सादर केल्या आहेत. यामध्ये सोन्याच्या वाढत्या भावामुळे प्रति १० ग्रॅम ₹३००० ची थेट बचत ग्राहकांना मिळणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर सरळ २०% सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १००% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. या सर्व ऑफर्स २६ एप्रिल २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत.
ग्राहकांना आधुनिक सुविधा आणि उच्च दर्जाच्या सेवेसह उत्कृष्ट खरेदीचा अनुभव घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक श्री. सिध्दार्थ शहा व श्री. आदित्य शहा यांनी निपाणीकरांसाठी केले आहे.