🟣 निपाणी नगरी वृत्तसेवा.(3)
कागल तालुक्यात पूर्वा कुलकर्णी 91% गुणासह अव्वल; स्पर्धा परीक्षांसह डॉक्टर-इंजिनिअर घडविणारे विश्वासार्ह केंद्र ग्रँड सायन्स अकॅडमीने एचएससी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत शिक्षण क्षेत्रात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. अवघ्या सहा ते सात वर्षांच्या कालावधीत अकॅडमीने केलेली ही झपाट्याने प्रगती म्हणजे ‘गुणवत्तेची खात्री’ असे समीकरणच निर्माण झाले आहे.
यंदाच्या निकालात कु. पूर्वा श्रीधर कुलकर्णी हिने कागल तालुक्यात 91% गुणासह प्रथम क्रमांक पटकावत विज्ञान शाखेत आपला ठसा उमटवला. तिच्या या यशामुळे अकॅडमीच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाची आणि नियोजनबद्ध अभ्यास पद्धतीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
तिच्यासोबतच दीप्ती खाडे (82.83%), विपुल चौगुले (81%), नेहा तेलवेकर (81%), अन्विशा गुप्ता (80.83%), चेतन पाटील (80.67%), अमृत पाटील (80.50%), धनश्री पोकले (79.67%), ऐश्वर्या देशपांडे (78.17%), अनुष्का सुतार (78%), आदिती मुसळे (77%) तसेच श्रुती शेळके (70.67%) यांनीही भरीव यश संपादन करत अकॅडमीच्या यशमालिकेत मोलाची भर घातली आहे.
ग्रँड सायन्स अकॅडमी ही केवळ निकालापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याचे सक्षम व्यासपीठ म्हणून ओळख निर्माण करत आहे. दहावीनंतर जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची पद्धतशीर तयारी, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित टेस्ट सिरीज यांच्या जोरावर विद्यार्थ्यांना डॉक्टर व इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करता येते.
व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून अकॅडमीची ही यशस्वी घोडदौड अधिक वेगाने सुरू असून ‘गुणवत्ता, शिस्त आणि परिणाम’ या त्रिसूत्रीवर आधारित शिक्षणपद्धतीमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमीबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.
मागील काही वर्षांत अकॅडमीमधून घडलेले अनेक विद्यार्थी आज देशातील नामांकित आयटी व तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असून आपल्या यशाने अकॅडमीचा लौकिक अधिकच उंचावत आहेत.
ग्रँड सायन्स अकॅडमीचा हा यशस्वी प्रवास म्हणजे केवळ निकालाची गोष्ट नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे. भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करत अकॅडमी शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.