निपाणी नगरी वृत्तसेवा.(3)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व अग्रगण्य आणि कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बेंगलुरु मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेचे चेअरमन किशोर बाली यांनी नुकताच एक महिन्याचा अमेरिका दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून आल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन, व विद्यमान व्हाईस चेअरमन, डॉक्टर सी बी कुरबेट्टी, सौहार्द फेडरेशन डेव्हलपमेंट चिकोडी ऑफिसर जवाहर रवींद्र मुगनावर,यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संचालक प्रताप पट्टनशेट्टी , डॉक्टर एस आर पाटील श्रीकांत परमणे सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी,अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील ,संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी. सीईओ एस के आदन्नावर. असिस्टंट सीईओ महेश शेट्टी. भद्रेस फुटाणे ,विद्या कमते, महादेव बडगीर,सुरज घोडके चंद्रकांत हंबर व असंख्य कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.