निपाणी नगरी वृत्तसेवा दिनांक (11)
शालेय अभ्यासक्रमात आज नाविन्यपूर्ण विषयाबरोबरच अनेक विविध उपक्रमांचा देखील कार्यभार शालेय पातळीवरती आयोजित केला जातो या सर्वांबरोबरच निवडणूक पद्धत हा उपक्रम कशा पद्धतीने असतो याची शालेय जीवनात माहिती व्हावी व लोकशाही मूल्यांचे महत्त्व यातून कळावे आणि आपण आपला नेता कशा पद्धतीने निवडला जातो याची प्रत्यक्षात कार्यप्रणाली समजावी या उद्देशाने शालेय पातळीवर निवडणुकांचे आयोजन केले जाते. म्हणूनच शालेय पातळीवर भविष्याच्या दृष्टीने लोकशाहीची मूल्ये रुजवणे हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शाळेच्या संचालिका डॉक्टर प्रविणाभाभी शाह यांनी केले त्या गर्ल्स मराठी कॉन्व्हेंट स्कूल निपाणी येथे शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेल्या विद्यार्थिनींच्या शपथविधी समारंभात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका डॉ.एस जे पाटील व मुख्याध्यापक आर पी बामणे उपस्थित होते
त्या पुढे म्हणाल्या ज्या ज्या विद्यार्थिनी शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेत त्यांनी आपले अधिकार ग्रहण करून शालेय कामकाज चांगल्या पद्धतीने चालवावे तसेच ज्या विरोधी गटामध्ये आहेत त्यांनी देखील या कामकाजामध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग दर्शवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रारंभी डॉ.एस जे पाटील यांनी प्रास्ताविकातून संपूर्ण शालेय कामकाजाची माहिती या विद्यार्थिनींना दिली
यावेळी शाळेची पंतप्रधान म्हणून कुमारी श्रीशा वैभवकुमार चव्हाण उपपंतप्रधान म्हणून मानसी अनिल धोंडफोडे व सभापती म्हणून अन्वी अमित बारड यांना तसेच वर्गवार निवडून आलेल्या वर्गप्रतिनिधींना डॉ.प्रवीणाभाभी शाह यांनी त्यांच्या पदाची व गोपनीयतेची शपथ दिली प्रारंभी उपस्थितांचे स्वागत श्री आर पी बामणे यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी एस आर इराज पी आर पाटील यु बी नागावे एम एम चिकोडे ए डी पाटील पी एम कवाळे ए व्ही हिरेमणी ए एन साळुंखे प्रज्ञा आवळेकर सी ए इंदलकर शशिकांत हवालदार रूपाली केरीमणी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी एम बाडकर यांनी करून आभार मानले.