निपाणी नगरी वृत्तसेवा (11)
वेंकटेश मंदिर, निपाणी येथे प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक डॉ. संजय गरुड यांचा “संतवाणी ” हा भजन, भक्ती गीताचा कार्यक्रम पार पडला. सुरवातीस अकादमीच्या अध्यक्षा डॉ. मीना ससे यांनी गायक व कलाकारांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. त्या नंतर पाहुण्या कलाकारांच्या हस्ते व श्री. रमेश पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. त्या नंतर उपाध्यक्ष श्री. अरुण हळदीकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुहास शहा यांनी पाहुण्या कलाकारांची ओळख करून दिली. त्या नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. पंचपदीचे काही अभंग सादर केले. रूप पाहता लोचनी, इत्यादी “बाजे मुरालिया बाजे “,तर “तिर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल “, लक्ष्मी बाराम्मा, ही गाणी सादर केली. कार्यक्रमाची सांगता “अगा पंढरीच्या राया “ह्या भैरवीने केली. दोन अडीच तास भक्तीरसात श्रोते दंग होऊन गेले. शेवटी श्री रमेश पै यांचा सत्कार केला ज्यांच्या मुळे हा कार्यक्रम होऊ शकला. शेवटी उपस्थितांचे व कलाकारांचे आभार श्री. सुजय शहा यांनी मानले.