निपाणी नगरी वृत्तसेवा (22)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि अग्रगण्य व कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बेंगलुरु मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले,यांची नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल, संस्थेच्या श्री महात्मा बसवेश्वर, सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या, प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न ,संस्थापक चेअरमन ,व विद्यमान व्हाईस चेअरमन, डॉक्टर सी.बी कुरबेट्टी व संस्थेचे चेअरमन किशोर बाळी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, व परमपूज सिद्धेश्वर, महास्वामीजी यांच्या फोटोचे पूजन करून फोटो ना पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप, प्रज्वलन करण्यात आले.
व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले , निपाणी भागाच्या आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार डॉक्टर सी बी कुरबेट्टी व संचालक प्रताप पट्टणशेट्टी. व सुरेश शेट्टी ,यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व मोमेंटो देऊन करण्यात आला.
तसेच ,कार्यक्रमांमध्ये बोलताना ,डॉक्टर सी बी कुरबेट्टी म्हणाले की, जोल्ले यांना या नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर नियुक्ती केल्याबद्दल या मंडळाला एक सहकाराचा अभ्यासक व सहकार चळवळीची तळमळ असणारा , सहकार चळवळीला बळकटी, व प्रोत्साहन देणार नेतृत्व, या मंडळाला मिळाले आहे. त्यामुळे आपल्या देशातील सहकार चळवळीला गती व चालना मिळणार आहे. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळून खेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार चळवळ विस्तारणार आहे. व सर्वसामान्य माणसाला आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे सामान्य माणसाचे जीवन सुधारून रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत असे सांगितले.
कार्यक्रमास संचालक डॉक्टर एस आर पाटील, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस के आदन्नावर ,असिस्टंट सीईओ महेश शेट्टी ,भद्रेश फुटाणे ,विद्या कमते, महादेव बडगीर, सुजाता जाधव, चंद्रकांत हंबर, सुरज घोडके, व असंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मगदूम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.