निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
निपाणी साखरवाडी व प्रतिभा नगर येथील परिसर स्थित प्रसिद्ध मरगूबाई मंदिरात सालाबादप्रमाणे उद्या, दिनांक ७ रोजी वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त भाविकांना श्री मरगूबाईचे दर्शन सुलभतेने घेता यावे यासाठी प्रशासकीय व सामाजिक पातळीवर स्वच्छता मोहीम राबवून भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
या यात्रेसाठी मरगुबाई मित्र मंडळ, यात्रा कमिटी (साखरवाडी, निपाणी) यांच्या वतीने सर्व सोयी-सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यामध्ये संभाजी महाराज उद्यान – नेचर क्लबचे विशेष सहकार्य लाभले असून परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण वेगाने पूर्ण करण्यात आले आहे.
उद्या होणाऱ्या या धार्मिक उत्सवाला नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा आणि यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.