निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
निपाणी येथील लिटल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या 10 विद्यार्थ्यांनी लोकमत कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक (Gold Medal), रौप्यपदक (Silver Medal), कांस्यपदक (Bronze Medal), प्रमाणपत्रे (Certificates), स्मार्ट वॉच (Smart Watch) तसेच एक्झाम पॅड (Exam Pad) प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विशेष म्हणजे, या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी मानाची ट्रॉफी पटकावली. ही मानाची ट्रॉफी शाळेसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे मोठे यश मानले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. प्रसन्नकुमार गुजर, उपाध्यक्ष श्री. सचिन खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश कदम, मुख्याध्यापिका सौ. फकरुनिसा मुल्ला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. महेश कांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व पालकांचे मोलाचे सहकार्य, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शना मुळेच विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.