निपाणी नगरी वृत्तसेवा (23)
कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर वुशू स्पर्धेत कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल , आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत या स्पर्धेत २ सुवर्ण, १३ रौप्य व ७ कांस्य अशी एकूण २२ पदके पटकावली आहेत.
सायली सणबे व श्रावणी मिरजे यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर मयुरी अंबेवाडकर, वैदही कमलाकर, सुजल उमाप, मानसी दळवी, प्रगती गावडे, श्रावणी जाधव, पूनम गावडे, मयुरी पाटील, आरती जगताप, भाविका पाटील, निकिता कांबळे, श्रावणी मोहिते व वैष्णवी कोळी यांनी रोप्य पदक पटकावून यश मिळविले.
तसेच धुळा बोरगावे, पार्थ मोगवीर, आदित्य जबडे, लक्ष गुदले, ओम पुजारी, आर्यन शेळके व अरिहंत अक्कोळे या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावून उज्वल यश संपादन केले असून अनेक विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय वूशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुमित खोत यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहावे आणि ‘मी करू शकतो’ हा आत्मविश्वास मनात ठेवून सतत प्रयत्नशील राहावे. आज मिळालेले हे यश ही शेवटची पायरी नसून भविष्यातील मोठ्या यशाची सुरुवात आहे असे मत प्राचार्य अनमोल पाटील यांनी व्यक्त केले . विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी संस्थेचे सचिव कुमार पाटील, अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.