निपाणी नगरी वृत्तसेवा (2)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. दिभागीरथीबाई शाह कन्या शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे .पाटील ,एस आर हवालदार , आर पी बामणे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, प्रतिमेचे पूजन करून दोन्ही महान नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या ओघवत्या वाणीत गांधीजींचे ‘सत्य आणि अहिंसा’ हे मूल्य आणि शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचा सखोल अर्थ उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज विद्यार्थिनींनी भाषणांमधून स्पष्ट केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ एस जे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधीजींच्या साधेपणावर आणि शास्त्रीजींच्या प्रामाणिकपणावर प्रकाश टाकला. विद्यार्थिनींना या दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन देशाचे सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी रघुपती राघव राजाराम हे गांधीजींचे भजन त्यांनी सादर केले.
यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, पी आर पाटील ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, के आर चोपडे, व्ही एम शेवाळे, सुभाष माळी . पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे , पालक व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या . सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.