निपाणी नगरी वृत्तसेवा (17)अर्जुननगर
येथील देवचंद कॉलेजच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या एम.ए. भाग–२ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देवचंद कॉलेज अर्जुननगरच्या इंग्रजी विभागातील कु. हर्षदा अनिल भोईटे, कु. कोमल सुभाष सावंत आणि कु. ऋतुजा रमाकांत गौस देसाई या विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्तायादीमध्ये अनुक्रमे तिसरा, पाचवा आणि दहावा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थिनींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशासाठी इंग्रजी विभागातील डॉ. आनंदी कांबळे, श्री. बी. जी. पाटील, श्रीमती ज्योती बुवा, श्रीमती स्मिता पाटील, डॉ. दिपा मडिवाळ, श्री. विनायक वरूटे तसेच श्रीमती वनिता कांबळे यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांचे प्रोत्साहन लाभले. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. रमेश साळुंखे यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह तसेच उपाध्यक्षा मा. डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह आणि इतर संचालक मंडळाचे विद्यार्थिनींना प्रोत्साहन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.