निपाणी नगरी वृत्तसेवा (31) अर्जुननगर
मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगर येथील दोन विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील कु. समर्थ बबन निर्मले आणि कु. रुही धोंडीराम बोधले यांची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जगभरातील एकूण १७ देशांतील तायक्वांदो खेळाडू या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशा प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड होणे ही विद्यालयासाठी तसेच अर्जुननगर परिसरासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले असून त्यांना सद्गुरू तायक्वांदो अकॅडमीचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भरारी घेणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.