निपाणी नगरी वृत्तसेवा (31) अर्जुननगर
नवनीत युवा मास्टर स्ट्रोक या कंपनीच्या वतीने ऑगस्ट २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत जनता शिक्षण मंडळ संचलित मोहनलाल दोशी विद्यालय, अर्जुननगर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील तब्बल ११० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेतील मोठ्या गटामध्ये स्वरा विनोद गुंडाळे (इयत्ता नववी अ) हिने प्रथम क्रमांक, गुरुदत्त तुकाराम सुतार (इयत्ता नववी ब) याने द्वितीय क्रमांक, तर समीक्षा संतोष देसाई (इयत्ता नववी अ) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
लहान गटामध्ये निधी प्रवीण लोहार (इयत्ता सहावी अ) हिने प्रथम क्रमांक, ऋतुजा मारुती पाचमसे (इयत्ता सहावी ब) हिने द्वितीय क्रमांक, तर सुजल अविनाश बाबर (इयत्ता पाचवी अ) याने तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकले विषयी आवड, सर्जनशीलता आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना कलाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.