निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचालित सौ भागिरथीबाई शाह कन्याशाळा निपाणी येथे आठवडी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस. जे.पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. अभ्यासाबरोबर विद्यार्थीनीना व्यवहार ज्ञानही समजावे. त्याना बाजार भावाची माहीती व्हावी आपल्याच शेतात पिकणारा भाजीपाला बाजारात विकण्याचे ज्ञान व्हावे. या उद्देशाने तसेच विद्यार्थीनीचे विक्री कौशल्य तसेच खरेदी कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने तसेच विद्यार्थीनींचा सर्वांगीन विकास व्हावा व व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या आठवडी बाजारा मध्ये पालेभाज्या,फळभाज्या,फळे,कडधान्ये तिळगुळ यांचे जवळजवळ 50 पेक्षा जास्त स्टॉल मांडण्यात आले होते. उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास श्री आर पी बामणे, यु.बी. नागावे, एम.एम. चिकोडे, एस.आर. इराज, ए.डी.पाटील, ए. आर. पाटील, व्ही.ए.निगवे, एस.एस.घाटगे, आर.व्ही.मधाळे, आर.आर. सुतार, के.एन मंगसुळे, जे.एम. शिंत्रे, जे.सी. चंद्रकुडे. के. एस.भादुले, पी. एम. कवाळे, जयश्री कुरबेट्टी, पी.आर. पाटील, ओ एम.कुलकर्णी, आर. ए. कांबळे, आदी शिक्षक विद्यार्थीनी कर्मचारी उपस्थित होते. श्री सी.एम. बाडकर यांनी आभार मानले.