निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भागिरथीबाई शाह कन्याशाळेत भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार अनिलकुमार मेहता हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रवीणाभाभी शाह, संचालक प्रसन्न दोशी,श्री आर. पी. बामणे आदी उपस्थित होते.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सौ एस.जे.पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, विद्यार्थीनीनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. सर्व वर्गात वर्गसजावट करण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट फलकलेखण तसेच सर्व, विषयांच्या अभ्यासाचे तक्ते तयार करण्यात आले होते. विद्यार्थीनींनी विज्ञान आकृत्याच्या रांगोळ्या काढल्या होत्या. हृदय, नेफ्रॉन, मेंदू फलन, उत्सर्जन संस्था, सुद्धदर्शक यंत्र, फुलांचा छेदा आदी उत्कृष्ट रांगोळ्या काढल्या होत्या, गर्ल्स मराठी कॉन्हेंट स्कूल च्या विद्यार्थीनीचे हस्तकला ‘प्रदर्शन मांडले होते. यामध्ये झाडांची पाने, सुंदर फुले, कागद व इतर नैसर्गिक टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती तयार केल्या होत्या. मातिपासून विविध घरगुती छोट्या वस्तू विद्यार्थीनीनी तयार केल्या होत्या.
कार्यक्रमास यु.बी. नागावे, एम. एम. चिकोडे, एस.आर इराज, ए.डी. पाटील, ए. आर पाटील, व्ही.ए. निगवे. एस एस घाटगे, आर.आर. सुतार, आर. व्ही मधाळे, के. एम. मंगसुळी जे.एम. शिंत्रे, जे.शी चंद्रकुडे के. एस. भादुले, पी एम. कवाळे,जयश्री कुरबेटी, पी.आर. पाटील, ओ.एम. कुलकूणी, आर. ए. कांबळे, एस. एम कोने यांच्यासह पालक विद्यार्थीनी कार्यक्रमास उपस्थित होत्या, श्री. सी. एम. बाडकर यांनी आभार मानले.