निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
परंपरा आणि संस्कृती जपत मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे २४ /०१/२०२६ रोजी हळदी-कुंकू सोहळा व होम मिनिस्टर चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व शारदा पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उदघाटन केले.
त्यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक महिलेला औक्षण करून विविध प्रकारचे वाण देण्यात आले. कार्यक्रमास निपाणीतील सर्व स्त्रिया तसेच निपाणीतील महिला मंडळ च्या सर्व अध्यक्षा सदस्य पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले निपाणीचे राजेश माने यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा देत आई-वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. त्यांनी उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक असणाऱ्या होम मिनिस्टरचे वेगवेगळे खेळ घेतले.
तसेच निपाणीतील स्त्रियांना स्व रोजगाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेने त्यांच्यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले होते. या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थित पालक वर्गाने आनंद व्यक्त केला. पालकांनी शाळेच्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” म्हणत प्रेमाचे व आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. परंपरा आणि नातेसंबंध सशक्त करणारा हा सोहळा पालकांसाठी अविस्मरणीय ठरला. संक्रांतीचा गोडवा अनुभवत, एकत्रित येण्याचा आनंद साजरा करत मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये हा स्नेहमेळावा सोहळा उत्साहात पार पडला.
होम मिनिस्टर मध्ये स्त्रियांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर मध्ये पैठणीच्या मानाच्या मानकरी या सौ तेजस्विनी तुषार चव्हाण वहिनी ठरल्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या मानकरी या भाग्यश्री विक्रम मोहिते वहिनी तृतीय क्रमांकाच्या मानकरी अमृता अतुल घाटगे व चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या सुषमा बजरंग चव्हाण या ठरल्या. तसेच शेवटच्या राऊंड मधून बाद ठरलेल्या 12 खेळाडूंना शाळे कडून वेगवेगळी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच उपस्थित स्त्रियांसाठी वेगळे स्पॉट गेम घेऊन विजेत्यांना आकर्षक बक्षीस शाळेकडून देण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा मंडळ बेळगाव संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जी नागराजू, शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शऩ लाभले. मॉडर्न इंग्लिश स्कूलने राबविलेल्या या नव्या उपक्रमाचे सर्व सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे.