निपाणी नगरी वृत्तसेवा..(2)
येथील लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अमेरिकन पाहुणे दिलीप वोरा आणि डॉ मेघा अरुणकुमार दोशी यांचे स्वागत स्कूलचे चेअरमन प्रसन्नकुमार गुजर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुलांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले
पुढील दहा वर्षात भारत आर्टिफिशल इंटेलिजंट होणार या विषयी माहिती दिली. आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे काय तर एखाद्या वस्तू विषयी एखाद्या स्थळा विषयी एखाद्या संगीता विषयी एखाद्या वाहना विषयी या व अशा अनेक गोष्टींबद्दलचे विचार आहेत त्या बद्दलची इत्यंभूत माहिती म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजंट आपण त्याला नॉलेज बुक असं म्हटलं तरी पण काही गैर वाटणार नाही.
अमेरिकेची जीवन पद्धती व आपली जीवन पद्धती शिक्षण याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याचबरोबर मुलांनी स्वतःचे काम स्वतःच करावे त्यांनी स्वावलंबी बनावे त्याचप्रमाणे मुलांनी आर्थिक दृष्ट्या आपल्या आई-वडिलांना आधार द्यावा हे स्पष्ट केले.
गट चर्चेतून ज्ञान रचना निर्मिती व्हावी मोबाईलचा उपयोग गेम रिल्स बघण्यासाठी नव्हे तर कौशल्य रचनेसाठी केला जावा आर्टिफिशियल इंटेलिजंट हे या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्यानंतर शालेय मुले शिक्षक आणि पाहुणे यांच्यात प्रश्नांची जुगलबंदी करण्यात आली मुलांना त्यांच्याकडून एक प्रकारचे ज्ञानामृत देण्यात आले
कार्यक्रमास चेअरमन प्रसन्न कुमार गुजर, सौ. सीमा गुजर, शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.