निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर प्रतिनिधी (15)
येथील मोहनलाल दोशी विद्यालया मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवचंद कॉलेजचे प्रा सदानंद झळके हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी “विद्यार्थांनी आयुष्यात टक्केवारीच्या मागे न लागता स्वताचा गुणात्मक विकास साधावा त्यासाठी सतत अवांतर वाचन करावे ,आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी, आयुष्यात संकटरुपी घाव सोसल्या शिवाय यशरुपी दैवत प्राप्त होत नाही ” असे मत मांडले.
प्रारंभी प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांनी दहावीच्या विद्यार्थ्याना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सृष्टी बाबर, उमेरा भाईशेख, श्रावणी पोतदार,श्रावणी टिंगरे, संस्कृती मोरबाळे, गौरव बोरगावे यानी मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतीने व्ही के परीट यांनी मनोगते व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर एस भोसले, शिक्षक प्रतिनिधी एस एम चौगुले, कर्मचारी प्रतिनिधी ए आर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन एस के बुच्चे यांनी तर आभार एस.बी.यादव यांनी मानले.
कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले