मराठा मंडळ बेळगांव संचलित, मराठा मंडळ फार्मसी कॉलेजमध्ये ज्येष्ठ शिक्षिका सौ. जी. बी. पाटील यांचा महिला दिनानिमित्त सत्कार!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद पाटील हे होते!

निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
बेळगाव मराठा मंडळ संचलित, मराठा मंडळ फार्मसी कॉलेज निपाणी मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन त्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे बेळगाव मराठा मंडळ संचलित, मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. जी. बी.पाटील होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रमोद पाटील हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी आणि राजमाता जिजाऊ यांच्या फोटो पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने करण्यात झाली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सौ. जी. बी. पाटील ह्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये 1988 सालापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे पाटील यांनी आपल्या मनोगतात गृहिणी आणि शिक्षिका म्हणून काम करताना आलेले अनुभव सांगितले आणि आत्ताच्या मुलींनी सक्षम तसेच समाजात वावरताना सतर्क असले पाहिजे असे सांगितले.
प्राचार्य प्रमोद पाटील यांनी महिला दिन साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित केले. आपल्या देशाच्या प्रथम नागरिक एक महिला आहेत. तर मराठा मंडळ बेळगाव ह्या कर्नाटकातील नावलौकिक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. राजश्री नागराजु या महिला आहेत आणि त्या ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असल्याचे सांगितले.
कॉलेजच्या महिला तक्रार निवारण कक्षाच्या प्रमुख प्रा. शामल पाटील यांनी आमची संस्था आणि कॉलेज महिला सुरक्षेसाठी नेहमी प्राधान्य देते असे सांगितले. यावेळी कॉलेजची विद्यार्थिनी कु. विनया पारळे हिचा तायक्वांदो क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळवल्या बद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॉलेजच्या विद्यार्थिनी कु. नंदिनी पाटील, कु. आलिशा मुजावर, कु. शुभांगी डावरे आणि कु. प्रज्ञा माने यांनी आपल्या मनोगता मध्ये महिलांचे सक्षमीकरण, महिलांचे समाजातील महत्त्व आणि देश कार्यातील सहभाग याबद्दल विचार मांडले. कार्यक्रमा निमित्त मुलींसाठी केस रचना आणि मुलांसाठी चित्रकलेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुप्रिया मगदूम यांनी केले तर आभार कु. कल्याणी तेली यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रियंका पाटील आणि प्रा. शुभम प्रताप यांनी केले.