श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी येथे 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा!
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निपाणी नगराध्यक्षा सौ सोनल कोठडीया व देवचंद कॉलेजच्या प्राचार्या डॉ जी डी इंगळे होत्या!

निपाणी नगरी प्रतिनिधी (8)
श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी येथे 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक सौहार्द फेडरेशन मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य व निपाणी परिसरातील लौकिक श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने 08 मार्च 2025 जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निपाणी नगराध्यक्षा सौ सोनल कोठडीया व देवचंद कॉलेज अर्जुन नगर प्राचार्या डॉ जी डी इंगळे तसेच संस्थेच्या संचालिका सौ पुष्पा कुरबेट्टी. सौ सुवर्णा पटनशेट्टी व श्रीमती विजया शेट्टी व व श्रीमती गीता कदम व मान्यवर महिला यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामी यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आपल्या मनोगता मध्ये निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडीया म्हणाल्या की आज स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ झाशीची राणी, लक्ष्मीबाई समाज सेविका, मदर तेरेसा तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म, अंतराळ वीर कल्पना चावला, तसेच निपाणी तालुक्याचे आमदार सौ शशिकला जोल्ले, तसेच चिकोडी तालुक्याच्या खासदार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमठवत पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून योगदान देत आहेत.
तसेच प्राचार्या डॉ जी डी इंगळे म्हणाल्या की आठ मार्च हा खास दिवस महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळवण्यासाठी तसेच त्यांच्या जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो संपूर्ण जगभरात महिलांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत अनेक क्षेत्रात यशाचे उंच शिखर गाठत आहेत. महिलांनमध्ये जण जागृती निर्माण व्हावी अशा उद्देश्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते. आज महात्मा बसवेश्वर संस्थेने महिला दिनाचे आयोजन करून महिलांचा सन्मान केला याचा आम्हा महिला मंडळींना मोठा अभिमान वाटतो. असे श्रीमती गीता कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उदगार काढले.
या कार्यक्रमास संस्थापक चेअरमन डॉ. सी बी कुरबेट्टी, चेअरमन श्रीकांत परमणे व्हा चेअरमन प्रताप पट्टणशेट्टी शाखा संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्री महेश बागेवाडी, श्री सुरेश शेट्टी, श्री किशोर बाली, (सी ए), श्री अशोक लिगाडे, श्री सदानंद दुमाले, श्री सदाशिव धनगर, श्री दिनेश पाटील, श्री प्रताप मेत्राणी, तसेच गुरुवार पेठ महिला शाखा निपाणी, अकोळ रोड महिला शाखा व शिवाजी नगर महिला शाखा याचे चेअरमन व्हा चेअरमन व संचालिका तसेच सी.ई.ओ. एस. के. अदनावर व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ सुजाता जाधव यांनी केले व उपस्थितांचे आभार सौ पूजा इंगळे यांनी मानले.